Monday, May 30, 2011

वरदा चंडिका प्रसनोत्सव

बापुराया काय वर्णावा तो ‘वरदा चंडिका प्रसनोत्सव ! फक्त सद्गुरुंचे अधिष्ठान असलेला, भक्ति आणि वात्सल्याने रसरसलेला उत्सव होता. सर्वकाही अफाट होत.

वैभव आणि ऐश्वर्याने नटलेल्या सभामंडपातील प्रत्येक इवेंट सीमांत होता.
ज्या वेळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 7/5/११ रोजी बापुरायाने प्रतिष्ठापना केलेल्या मोठी आई महिषासुरमर्दिनी, महाकालिमाता आणि महासरस्वतीमाता, ह्या देवता सर्वाना दर्शनासाठी खुल्या केल्या त्या वेळचे प्रथम दर्शन अतिशय रम्य ,मनोहारी, अवर्णनीय आणि ह्रुदयस्पर्शी होत.

नंतर रविवार दिनांक 8.5.11 ह्या दिवशी सर्व इवेंट पाहता पाहता सहजपणे मला
“मेरा नाम जोकर ” ह्या हिंदी सिनेमामधील गाण्याच्या पुढील ओळी आठवल्या

ये भाय जरा देखके चलो !
आगे भी नहीं पिच्छे भी !
दाए भी नहीं बाए भी !
उप्पर भी नहीं निचे भी …..

कारण, सर्वत्र ऑडियो, विडियो बापुरायच दिसत होते, ऐकायला येत होते, त्यांच्या मंत्रघोषनीच सर्वत्र पूजन सुरु होते. तसेच संस्कृत मधील मातृवात्साल्याविन्दानाम ह्या ग्रंथाचे पठनही चालू होते “दुर्गा वरदा होम येथे, इति बापुराय आणि आम्हा सर्वानबरोबरही ह्या सोहोल्यामध्ये होते दादा, बापू, नंदाई.

सर्वत्र भक्तिमय वातावरणात भक्तिच्याच ९ पायरयांवरून चालत दर्शन होत होते. अशा प्रकारे ११ दिवसांच्या उत्सवातील पहिला दिवस - एक नवचैतन्याने भरलेला जीवनपट पुढे सरकत होता. नवलाई होती तर्सेच नाविन्यहि होते पण उत्सवातील प्रत्येक गोष्ट बापूंनी आम्हा भक्ताना उत्सवापुर्वी 9-10 महीने आधी सांगितलेली होती. त्यामुळे नवलाई खुपच होती.

जिथे आपलेपण असते तिथे जिव्हाळा असतो आणि हेच आमचे दैवत (गुरुमाउली)
तिथेच फक्त सत्चिदानंद लाभतो तो सर्व ह्या उत्सवामध्ये भरभरून आम्ही अनुभवला.

छोटीशी मार्गदर्शिका होती उत्सवाची जी आम्हाला उत्सवापुर्विच मिलाली होती. तसेच तंतोतंत सर्व इवेंट उभे केलेले होते .
एवढा अफाट उत्सव, त्याची मांडणी, त्यासाठी लागणारे प्लानिंग, मनुश्यबल, कारागीर, कलाकार, हे सर्व तैयार होउन त्या देवतानमध्ये जीवंतपणा ओतणे हे फक्त
आमचे बापुरायच करू जाणे. शिवाय, उत्सवासाठी देणग्या गोळा करणे नाही, उत्सवाला प्रसिध्ही देण नाही, प्रसार नाही प्रचार नाही,कोणतेही माध्यम नाही फक्त सद्गुरु वचन पालणे, असाहा जगावेगला चिरस्मरणीय, चिरस्थायी उत्सव, भरभरून आनंद देऊन गेला. || एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा ||
सद्गुरु वचन आहे. त्यामुळे सर्व इवेंट जसे सांगितले आह़ेत तसे करायचे मग शंका कुशंका मनात आल्याच नाहीत.

|| देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ||
पण आम्ही दहाही दिवस सद्गुरुसमवेत सत्च्चिदानंद लुटला. सत्संग झाला.
भक्ति आणि सेवानी देवालय गजबजून गेले होते .
फक्त देवाकडे जाउन नमस्कार करून परत येण नाही तर जे काही मनापासून करणार, उत्सवामध्ये सहभागी होणार त्याला प्रत्येकाला 100% लाभ मिळणांरच. अशी बापुन्ची ग्वाही आहे.

संपूर्ण उत्सवभर नियमित पुढीलप्रमाणे इवेंट आणि मंत्र पठण चालू होते :


1. पुढीलप्रमाणे जप दिवसभर चालू होता :

ओम ऐं रहम क्लीं चामुंडायै विच्चे |
नतेभ्य: सर्वदा भक्त्या चंडिके दुरीतापहे |
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विशौ जहि ||
ओम नम: चंडिकायै ||

2. त्यानंतर महाआरती दुपारी एक वाजता आणि रात्री नौ वाजता होत असे. आणि बापू नंदाई आणि दादा स्वत: करीत असत. तसेच महानैवेद्य आणि महाभोग दररोज सकाळ संध्याकाळ लेझीमच्या नादात आणि ढोलकीच्या तालात होत असे.
श्रद्धावानाना सामर्थ्य मिळावे म्हणून ह्या उत्सवात काही पुजनांचे आयोजन केले होते :

3. महाकाली कुड : ह्या कुंडआमध्ये भक्तांना असुर दहन द्रव्य अर्पण करता येत कारण त्या मुले कलीयुगातील मानवाच्या प्राणमय देहात असणारी त्या भयंकर कलीकेंद्रना क्षीण करण्यासाठी हे महाकली कुद आहे.
4. महलक्ष्मि दीप : कली युगात मानवाच्या शक्तीकेंद्रापैकी जी केंद्रे उदासीन झाली आहेत त्या शक्ती केंद्राना पुन्हा सशक्त आणि सक्रीय बनविण्यासाठी येथे सुरस्नेहन द्रव्य अर्पण करायचे होते.
5. महासरस्वती वापी : शुभंकर केंद्रे सक्षम हो ण्या साठी ह्या वापी म्हणजे विहिरीमध्ये मांगल्य द्रव्य की जी तेथेच उपलब्ध होती, ती अर्पण करावयाची होती.

6. महिषासुरमदिनीचा चौथा अवतार रक्तदनतीकेच्या शत्रुघ्नेश्वरी रूपाचे पूजन : हिचे स्वरूप अत्तिशय ऊग्र असले तरी श्रद्धावानांना ते अतिशय प्रेमळ आहे. म्हणून ते आपल्याला बघायचे आहे व तिचे पूजन करावयाचे होते.

७ सहस्त्रचंडी याग : हा याग देविसप्तशती ग्रंथानुसार सप्तशतीपाठ चे १० दिवस पठण-यजन व हे सर्व १०८ विशेष प्रशिक्षित पुरोहितांनी संपन्न केले.


८. श्रीदुर्गावरद होम : सदगुरु श्री अनिरुद्धांनी स्वत: संस्कृतमध्ये लिहिलेल्या मातृवात्सल्यविन्दानम अर्थात मातरीश्वर्यवेद: ह्या ग्रंथाचे वाचन करून ह्या यज्ञात हवन केले.

९. जान्हवीस्थानम येथे गंगामातेची स्थापना : ज्या दिवशी गंगा भागीरथी बनून पृथ्वीवर अवतरली तो दिवस म्हणजे १० मे आहे. बरोबर तोच दिवस म्हणजे १० मे २०११ रोजी ह्या उत्सवात ह्या ठीकाणी श्रीगंगेची स्थापना बापुरायाने केली. खरोखरीच गंगा पृथ्वीतलावर त्या दिवशी अवतरली..
सप्तसमुद्रांचे आणि संपूर्ण जगभरातून वाहनार्या शतनद्याचे हे जल (ह्या संस्था च्या कार्यकर्ते आणि भक्तांनी अतिशय परिश्रम करून) गंगामातेच्या अभिषेक साठी आणले होते. ह्या अभिषेकजलाला नाव आहे – ‘मुर्धाजलम’.

तसेच ह्या ठिकाणी शनिवार दिनांक १४ मे रोजी रात्री गौरी गंगेचा मिलाप आणि शिव गंगा गौरीचा अवतरण सोहोळाही बापुरायाने संपन्न केला.

एकूण ११ दिवस चालू असलेला हा चिरस्मरणीय सोहोळा मंगळवार दिनांक १७ मे ११ रोजी आपल्या आवडत्या गजर – जयंती मंगला काली | भद्रकाली कपालिनी ||
दुर्गा क्षमा शिवा धात्री | स्वाहा स्वधा नमोस्तुते ||
गजराने ह्या समारंभाची सांगता न होता हा उत्सव संपन्न झाला.

||हरिओम||

No comments:

Post a Comment